Amazon Ad

मेहकरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी,शासन निर्णय जाळला! म्हणाल्या, ही तर थट्टा..!

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा/अनिल मंजुळकर) : अंगणवाडी महिला कर्मचारी वर्ग नेहमीच दुर्लक्षित ठरला आहे. मागील २३ दिवसांपासून राज्यात आंदोलने सुरु आहेत. वेतनश्रेणी लागू करून पगारवाढ द्यावी अशी प्रमुख मागणी महिला कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. मात्र नुकतेच सरकारने या महिलांसाठी दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली. कालच असा शासन निर्णय प्रसिध्द करण्यात आला होता. मात्र हा निर्णय निराशा देणारा आहे असे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. आज, २७ डिसेंबरला जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात शासन निर्णयाची होळी करण्यात आली. व जोरदार निदर्शने केली.
 यावेळी माध्यमांशी बोलताना महिला कर्मचारी म्हणाल्या, "कोरोना काळापासूनच अंगणवाडी सेविका, मदतीनस यांनी जबाबदारीने कार्य पार पाडले आहे. आमची मागणी वेतन वाढीची आहे. सरकारने मदत जाहीर करून थट्टा केली आहे" असे महिलांनी सांगितले. यावेळी वंदना आराख ,(युनियन आयटक जिल्हा बॉडी) रंजना सपकाळ ,युनियन आयटक , मिना नेमाडे, सुलोचना पवार, मिनाक्षी चव्हाण, यासिन शहा संघमित्रा पवार, रेणुका शेजुळ, संतोष मोरे, सुरेखा गायकवाड, निर्मला सुरजने, आयेशा शिदीकी, यांच्यासह आदी अंगणवाडी सेविका हजर होत्या.