बुलडाण्यात एकाने दिवसाढवळ्या वृध्द महिलेला फसवले, म्हणाला राशन मिळवून देतो अन्..

 
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अलीकडच्या काळात जिल्ह्यात सर्वत्र चोरींचे प्रमाण अधिक वाढल्याचे चित्र आहे. बुलडाणा शहरात देखील दिवसाढवळ्या चोरीच्या घटना मध्यंतरी उघडकीस आल्या आहेत. बुधवारी,२७ डिसेंबरला अज्ञाताने वृध्द महिलेची फसवणूक केली. "तुम्हाला राशन मिळते का? मी तुम्हाला राशन मिळवून देतो"असे सांगून अज्ञाताने वृद्धमहीलेकडील चांदीचेकडे व मोबाईल चोरी केला. पसार व झाला.
थोडक्यात घटनाक्रम असा की , बुधवारी पार्वताबाई शेळके(७० वर्ष, रा.शिरपूर) व्यक्तिगत कामासाठी येथील सैनिक कल्याण कार्यालयात आल्या,त्यांनतर काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या निघाल्या मात्र, रस्त्यातच, स्टेट बँक चौक परिसरात एक अनोळखी माणूस त्यांना भेटला. आज्जी तुम्हाला राशन भेटते काय? नसेल भेटतं तर मी तुम्हाला मिळवून देतो असे म्हणुन त्याने हातातील चांदीचेकडे व मोबाईल पिशवीमध्ये ठेवायचा सांगितला. सांगितल्याप्रमाणे पार्वताबाई शेळके यांनी पिशवीमध्ये मोबाईल व कडे टाकून दिले. थोड्या वेळानंतर त्या पिशवी शोधू लागल्या तर पिशवी त्यांच्या निदर्शनास आली नाही. इतकंच नाही तर तो अनोळखी माणूस देखील नंतर दिसला नाही. त्यावरून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.