महिलांसाठी महत्वाची बातमी! नोकरी हवीय? खामगाव आयटीआयमध्ये उद्या रोजगार मेळावा...

 
बुलडाणा(
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हिंदुस्थान युनिलिव्हर लिमीटेडतर्फे खामगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थोत विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यता आला आहे. इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिलांकरिता खामगाव येथील आस्थापनेवर विशेष रोजगार भारती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता इन्फॉरमेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटन्स आणि कम्प्युटर ऑपरेट ॲण्ड प्रोग्रामींग ॲसिस्टंट या व्यवसायातून आयटीआय उत्तीर्ण आणि किमान १२ महिने औद्योगिक संस्थेत कामाचा अनुभव असलेल्या महिला उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, खामगाव यांनी केले आहे.