"बुलडाणा लाइव्हच्या" बातमीचा इम्पॅक्ट! अखेर देऊळगाव घुबे ते इसरुळ रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. स्थानिकांनी दिले 'बुलडाणा लाइव्हला' धन्यवाद !

 
Fgbn
देऊळगाव घुबे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: ऋषी भोपळे) जालना ते खामगाव अशा महत्त्वाच्या मार्गाला जोडल्या जाणारा चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे ते इसरुळ या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्हने शुक्रवारी प्रकाशित केले होते. दोन दिवसातच या वृत्ताची दखल घेत प्रशासन कामाला लागले आहे. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून मलगी, देऊळगाव घुबे, इसरूळ ग्रामस्थांनी बुलडाणा लाइव्हचे आभार मानले आहेत. 
 इसरुळ - देऊळगाव घुबे मार्गाची झालेली दयनीय अवस्था ग्रामस्थांनी बुलडाणा लाईव्हचे प्रतिनिधी ऋषी भोपळे यांना कळवली. त्यानंतर रस्त्याच्या बिकट अवस्थेची वर्णन करणारे तसेच ग्रामस्थांच्या व्यथा सांगणाऱ्या आशयाचे वृत्त बुलढाणा लाईव्ह प्रकाशित केले. सुमारे १० ते १५ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर दररोज शेकडो वाहनांची वाहतूक असते. खराब रस्त्यामुळे अनेक वाहनांमध्ये बिघाड होत असल्याचे दिसून आले होते. तसेच मृत्यूला आमंत्रण देणारा हा रस्ता ठरला होता. अखेर या रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांची चिंता मिटली आहे. रस्त्याचे कामाला सुरुवात होताच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ बुलडाणा लाइव्हला फोन करत आहेत. आणि केलेल्या पाठपुराव्या बद्दल आभार व्यक्त करत आहेत.