ध्येय कसे गाठावे हे बाबासाहेबांच्या जीवनचरित्रातून शिकायला मिळते: प्रा.रघुनंदन देशपांडे यांचे प्रतिपादन! राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलडाणा नगराच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

पुढे बोलतांना देशपांडे म्हणाले की, बाबासाहेबांनी १९५६ ला केलेले धर्मांतरण राष्ट्रीय चौकटीत राहून केले. धर्मांतर करण्याआधी अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी डॉ. बाबासाहेबांची भेट घेतली. मात्र डॉ.बाबासाहेबांचा राष्ट्रीय दृष्टीकोन कायम होता. हिंदू धर्माला आणि देशाला नुकसान होणार नाही याची काळजी बाबासाहेबांनी धर्मांतरण करतांना घेतली. १९४२ ते १९४६ मध्ये प्रांतिक सरकार मध्ये विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करतांना बाबासाहेबांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. इंग्रजांनी ज्या जलमंडळाची स्थापना केली होती त्यांनी भारतातील अतिरिक्त पाणी ही समस्या असल्याचा अहवाल दिला होता. मात्र बाबासाहेबांनी त्याला विरोध केला. पाण्याचा अभाव ही समस्या होऊ शकते, अतिरिक्त पाणी ही समस्या नाही तर अतिरिक्त पाण्याचे नियोजन नसणे ही समस्या आहे अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली, याच विचारातून पुढे हिराकुंड धरण बांधण्याचा विचार समोर आला असे देशपांडे यावेळी म्हणाले. "तुमचा जो जीवन उद्देश व ध्येय आहे त्याचा गाभा सत्यावर व नितीमत्तेवर आधारित आहे का ? हे तपासून बघा.सत्य व नीतिमत्ता असेल तर कार्याला यश उशिरा का होईना मिळेलच व या गोष्टींच्या अभावी तात्पुरते यश मिळवून कार्य लयास जाईल" हा डॉ.बाबासाहेबांचा विचार यावेळी देशपांडे यांनी पटवून दिला. यावेळी अश्रुजी अंभोरे, संदीप लहाने, ॲड. जयसिंगराव देशमुख, श्यामसुंदर पारीख, नंदकुमारजी खडके यांच्यासह बुलडाणा नगरातील स्वयंसेवक उपस्थित होते.