अवकाळीच्या कळा लागणार किती भोगाव्या? कोनड खुर्द च्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर!

 
tractor
चिखली: (ऋषी भोपळे; बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाच्या कळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे तुर, हरभरा, कांदा अशी पिके अक्षरशः नेस्तनाबूत झाली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे, मलगी भरोसा या गावातील शेतकऱ्यांनी नुकसानामुळे पिकात जनावरे सोडली तसेच कोनड खुर्द येथील शेतकऱ्यांनी  शेतात चक्क ट्रॅक्टर फिरवला..
 

 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली नसल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी चिंतेत असल्याचे पुन्हा दिसून आले. शिवाय वातावरणात झालेल्या बदलामुळे उर्वरित पिकांवरही दुष्परिणाम दिसू लागले आहेत. वातावरणात धुके पसरल्यामुळे पिके पिवळी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.