मजुरी करून त्याच्या भविष्याचा विचार करणारे आई वडील आता ढसाढसा रडत आहेत! काय झालं.. कसं झालं हे त्यांनाही कळत नाहीये; मेहकरच्या निखिलने असं करायला नको होत...!

 
Psc
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्याच वयच काय हो..अगदी कोवळ्या वयातला तो..पण का कुणास ठाऊक..त्याच्या डोक्यात काय आल ते..मजुरी करून त्याच्या भविष्याचा विचार करणारे आई वडील आता ढसाढसा रडत आहेत...काय झालं, कसं झालं हे त्यांनाही कळत नाहीये...निखिल रमेश मानवतकर (१७) असं त्याचं नाव...
मेहकर शहरातील जानेफळ रस्त्यालगत असलेल्या गारोळे यांच्या आरामशीन मागील अण्णाभाऊ साठे नगरात निखिल राहत होता. काल, त्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेच्या वेळी वडील मजुरी कामासाठी बाहेरगावी गेले होते तर त्याची आई धुणी भांडी करायला शेजारच्याकडे गेली होती.
 या काळात निखिलने राहत्या घरात दोरीने गळफास घेतला. निखिलचा लहान भाऊ घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली, यावेळी त्याने एकच टाहो फोडला..घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निखिलने का टोकाचा निर्णय घेतला याबाबत काही कळू शकले नाही..