हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गुळवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! चिखलीत शोककळा

 
hjk
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीतील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते दीपक गुळवे यांचे आज,२९ ऑगस्टला सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यामुळे चिखलीसह जिल्ह्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
 

दीपक गुळवे सध्या हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष होते. याआधी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. चिखलीतील स्वामी समर्थ केंद्राचे ते संस्थापक होते.आज सकाळी राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, यात त्यांचे निधन झाले.आज सायंकाळी ६ वाजता चिखली शहरातील जुने गाव हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.