अरेच्चा! १० रुपयाचा चहा पडला ३० हजाराला! बुलडाणा शहरातील घटना; नेमक झालं काय? वाचा
Jan 16, 2024, 16:00 IST
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अनेकजण चहाचे शौकीन आहेत. त्यांची चहा पिण्याची तगमग नेहमीचीच मात्र १० रुपयाची चहा पिण्यासाठी गेलेल्या एकाचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. त्याच झालं असं की,दुचाकी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी दिवसाढवळ्या चोरीला गेली. प्रकरणी काल १५ जानेवारीला गोपाल दोडके यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काल दुपारी शहरातील मोठी देवी परिसरात दुचाकी चोरीची अजब घटना घडली. दरम्यान दुचाकी मालक गोपाल दोडके (दुचाकी क्र. एम.एच२८ ए डब्लू ६२३८ किंमत ३० हजार रुपये) उभी करून जवळील चहाच्या टपरीवर मित्रासह चहा पिण्यासाठी गेले. मात्र परत आल्या नंतर त्यांना दुचाकी दिसून आली नाही.त्यांनी परिसरात इतरत्र शोध घेतला परंतु भरपूर वेळ झाला..तरी देखील दुचाकी कुठे आढलळी नाही त्यामुळे त्यांनी संध्याकाळी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.