उपचारासाठी छ. संभाजीनगरकडे नेण्यात येत होते, मात्र शहर सीमा ओलांडतानाच युवकाचा रुग्णवाहिकेत मृत्यू! रात्री घडला होता भीषण अपघात!

 
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)आज ९ जानेवारीच्या दुपारी अपघात ग्रस्त युवकाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला छ. संभाजीनगरकडे नेण्यात येत होते. दरम्यानच बुलढाण्यातील धाड नाका परिसरातच रुग्णवाहिकेत त्याचा मृत्यू झाला.अंकुश वाघ (२५वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. पुढील प्रक्रियेसाठी त्याचे पार्थिव सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे.
Ghube
                             जाहिरात 👆
काल ९ जानेवारीच्या रात्री वालसावंगी फाट्यावर भीषण अपघात घडला होता. अपघातातील गंभीर युवकावर येथील लद्द्धड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे डॉक्टरांनी छ.संभाजीनगर येथे हलविण्याचे घोषित केले. दरम्यान आज ९ जानेवारीच्या दुपारी संभाजीनगर कडे जात असतानाच शहर सीमेवर ,धाड नाका परिसरात रुग्णवाहिकेतच अपघातग्रस्त युवकाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव अंकुश वाघ (२५ वर्ष) असे आहे. पुढील प्रक्रियेसाठी त्याचे पार्थिव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे.