रोज शेतात झोपायचे जायचे,पण काल रात्री गेले नाही अन्... घात झाला! किनगाव राजाची धक्कादायक घटना

 
kingaon raja police station
सिंदखेड राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रोज रात्री शेतात झोपायला जाणारे शेतकरी काल, रात्री शेतात झोपायला गेले नाही. हीच संधी त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या चोरट्यांनी हेरली आणि शेतातील एक बैलजोडी आणि दोन छोटी जनावरे चोरली. आज,२ एप्रिलच्या सकाळी ही घटना उघडकीस आली.
 

animal

किनगाव राजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुरे चोरीच्या घटना सातत्याने वाढत आहे. मात्र पोलिसांना अजून या चोरट्यांचा सुगावा लागला नाही. किनगाव राजा येथील शेतकरी अशोक मारोती काकड (रा.किनगाव राजा, ता. सिंदखेडराजा) हे दररोज शेतात झोपायला जातात. मात्र काल,१ एप्रिलच्या रात्री त्यांच्या घरचे कुणीही शेतात झोपायला गेले नाही. कदाचित चोरट्यांनी हीच बाब हेरली असावी. दोन पांढऱ्या रंगाचे बैल ( अंदाजे किंमत १ लाख) आणि दोन छोटी गोवंशीय जनावरे ( अंदाजे किंमत३० हजार)  चोरट्यांनी चोरून नेली. आज ,सकाळी शेतात जनावरे न दिसल्याने त्यांनी शोधाशोध केली. गुरांच्या बाजारात जाऊन बघितले मात्र बैलजोडी व गुरे मिळून आली नाहीत. बातमीत असलेल्या फोटोत दिसणारी बैलजोडी कुणाला दिसल्यास 9112724093 या क्रमांकावर संपर्क साधावा. बैलजोडी ची माहिती देणाऱ्याला योग्य ते बक्षीस दिल्या जाईल असे आवाहन शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे.