ज्येष्ठ पत्रकार समाधान सावळे यांचा प्रथम पुण्स्मरणदिनानिमित्त उद्या डोंगरशेवलीत ह.भ.प पुरुषोत्तम पाटील महाराजांचे किर्तन!

 
ss

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):ज्येष्ठ पत्रकार समाधान सावळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन उद्या २२ नोव्हेंबर ,बुधवार रोजी जोगेश्वरी माता मंदिर संस्थान डोंगरशेवली येथे करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता  किर्तन सोहळ्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी सकाळी १० वाजता भाऊ पाटील फार्म हाऊस येथे स्वर्गीय समाधान सावळे यांच्या समाधी स्थळाची पूजन करण्यात येईल. त्यानंतर ११ ते दुपारी ३ वाजे दरम्यान स्मृतिभोज होणार आहे. 

आवाजाचे जादूगार म्हणून ओळख असणारे पुरुषोत्तम महाराज पाटील किर्तन सेवा करतील. त्यांनी किर्तनात गायलेली  'आई माझी मायेचा सागर' ही रचना  देशभर प्रसिद्ध आहे. भक्ती कीर्तनाने भाऊ पाटलांच्या स्मृतीस उद्या अभिवादन करण्यात येणार आहे.