हभप सुगदेव महाराज सपकाळ अंचरवाडीकर यांचे निधन! वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! वारकरी संप्रदायावर शोककळा; आज संध्याकाळी कर्मभूमी मोहना येथे होणार अंत्यसंस्कार...

 
Hbp
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार हभप सुगदेव महाराज सपकाळ यांचे आज,१० मे रोजी दुपारी साडेबाराला निधन झाले. कर्मभूमी मोहना येथील मुक्ताबाई आश्रम (ता.मेहकर) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला . मृत्युसमयी त्यांचे वय १०३ वर्ष एवढे होते. बाबांच्या इच्छेनुसार आज सायंकाळी ५ वाजता मोहना येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यासह जालना ,वाशिम जिल्ह्यात हभप सुगदेव महाराज यांचा मोठा शिष्यवर्ग आहे. बाबांचे मुळगाव हे चिखली तालुक्यातील अंचरवाडी आहे. अनेकांना वारकरी संप्रदायाची गोडी लावण्यात ह.भ. प सुगदेव महाराज सपकाळ यांचे मोठे योगदान आहे. सुगदेव महाराज सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यातील वारकरी संप्रदायावर, त्यांच्या शिष्यवर्गावर शोककळा पसरली आहे.