मोटारसायकलवरून चालवला होता गुटखा; जलंब पोलिसांनी सापळा रचून पकडले!

 
file photo
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवैध विक्रीसाठी गुटखा घेऊन जाणाऱ्या तरुणाला पकडून जलंब पोलिसांनी लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, ५ जानेवारीला जलंबमध्ये करण्यात आली.

प्रसाद सुपडा तळोकार (२५, ता. दसरा मैदान, शेगाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गुप्‍त माहितीवरून सहायक पोलीस निरिक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरिक्षक राहुल काटकाडे, पोलीस अंमलदार तुकाराम इंगळे, उद्धव कंकाळे, गोपाल सोनोने यांनी जलंबमध्ये सापळा रचला.

मोटारसायकलीवरून प्रसाद तळोकार हा ३१ हजार रुपयांचा गुटखा घेऊन जात होता. त्‍याच्‍याकडून गुटख्यासह ८० हजार रुपयांची मोटारसायकल, १ हजार रुपयांचा मोबाइल असा एकूण १ लाख १२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.