गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळा; हभप पुरुषोत्तम महाराजांनी गुंफले पहिले पुष्प; म्हणाले, वानप्रस्थाला कृतीषिलतेची सांगड घातल्याने तात्यासाहेब कर्मयोगी झाले...
श्री मुंगसाजी महाराज मंदिर परीसरात उपस्थितीत श्रोत्यांना संबोधीत करतांना हभप पुरूषोत्तम महाराज पाटील पुढे म्हणाले की, मानवी जिवन जगतांना मनुष्याने गरजवंताच्या बरोबरच गोरगरीबांची वेळप्रसंगी केलेली मदत आणि केलेल्या कल्याणकारी कार्याची शिदोरी हीच खरी संपत्ती म्हणुन मनुष्याच्या अंतिम प्रवासात सोबतीला असते. म्हणुन मनुष्याने जिवन जगतांना दुस-यांच्या दुःखाशी सरमस होत इतर फदयांत न पडता देवाचे चिंतन करावे, कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी सन्याशी महापुरूषासारखे जिवनं व्यतित केलं, त्यांनी केलेली लोकहित व जनकल्याणकारी कामे त्यांच्या पश्चातही त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहेत. तात्यांच्या पुण्याईने लावलेल्या इवल्याश्या रोपटयाचा आज वटवृक्ष झाल्याचे आपण सारे पाहत आहोत.
ज्ञानदानाबरोबरच अन्नदानालाही अनन्य महत्व असुन तात्यासाहेबांनी समाधानी जिवन जगतांना आयुष्याच्या शेवटचा काळ देवचिंतनात व्यतित केला. मानवीदेह नश्र्वर असुन मरावे परी किर्ती रूपी उरावे असे जिवन ते जगले. जीवनामध्ये पैसा, राजकारण इत्यादीच्या मागे न धावता मनुष्याला ईश्वर चिंतनाचे वेढ लागायला हवे, अन्यथा आजकाल लोक कोर्टात गितेवर हात ठेवुन सुध्दा खोटं बोलत असल्याची प्रचिती येते, तर व्यभिचार, भ्रष्टाचार करण्यासाठीही लोक लाजत नाहीत, मग आपण परमार्थ करतांना लाजायचे का म्हणुन मनुष्याला देवचिंतनाची आवड निर्माण होवुन परमार्थात वेड झाल्याशिवाय तुमच्यावर ईष्वराची कृपा होणार नाही. ते म्हणाले ‘जाम पर जाम क्या पिते हो ? हरिनाम का प्याला पिके देखो, जिंदगी सवर जायेगी’ कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी गेल्या अनेक वर्षापासुन प.पू.श्री मुंगसाजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यास सुरूवात केली होती.
पुण्यतिथ्या या आदर्शमय व्यक्तीच्याच साज-या केल्या जातात. जी व्यक्ती दुस-यांच्या दुःखात दुखी, तर इतरांच्या सुखात सुख मानते अशा व्यक्ती सदैव समाधानी असते. नुसती संपत्ती अफाट असुन चालत नाही, ती गोरगरीबांच्या कल्याणासाठी खर्ची घातल्या गेली पाहीजे, अन्यथा समुद्र हा विराट व अफाट असला तरी प्रवासात पिण्याचे पाणी सोबत न्यावे लागते कारण समुद्राचे पाणी खारट आहे. त्यानुसार संपत्ती असुन जर कोणाच्या उपयोगी पडत नसेल तर त्यातुन समाधान व फायदा काय असे सांगत कर्मयोगी स्व. तात्यासाहेबांनी केलेल्या कल्याणकारी कार्य व विविध प्रकल्प उभारणीचा उहापोह आपल्या वाणीतुन हभप पुरूषोत्तम महाराज यांनी केला.
किर्तनाच्या प्रारंभी सायंकाळी साडेसहा वाजता महाआरती घेण्यात आली यात सुमारे ५०० जोडपे सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री आवाजाचे जादुगार हभप श्री पुरूषोत्तम पाटील यांचे किर्तन संपन्न झाले. कार्यक्रम प्रसंगी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी चांडक, श्यामभाउ उमाळकर, माजी आमदार सौ.रेखाताई खेडेकर, शिवसेनेचे प्रा.नरेद्र खेडेकर, शिप्रम चे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, रामदास निमावत, विनायक सरनाईक, राजेश कोठारी, राजेंद्र वानेरे, अनंत देशपांडे, बल्लु सावजी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणीक व धार्मीक, अद्यात्मीक क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.