गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळा ! कर्मयोगी स्व.तात्यासाहेब बोंद्रेच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी भव्य रॅली, चिखलीकरांनी वाहली आदराजंली.
चिखली परीसरातील उजाड माळरांनावर तपोभूमी अनुराधा नगरीत जिल्हयातील शैक्षणीक क्रांतीसह सहकार क्षेत्राला उभारी देत असतांना धार्मीक व अद्यात्मीक कार्याची सांगड घालुन स्व. कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी प.पू.श्री मुंगसाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळ्यात मोठया प्रमाणात साजरा करण्यास सुरूवात केली होती. तर यावर्षी कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे व प.पू.श्री मुंगसाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा योग लागोपाट जुळून आला आहे. त्यानिमित्त गुरूशिष्य पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ३ दिवसीय कीर्तन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज, अविनाश महाराज भारती, व संजय महाराज पाचपोर यांचे किर्तन आयोजीत करण्यात आले आहे.
स्व. कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त अनुराधा परिवाराच्या वतीने काल स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालय येथुन भव्य रॅली काढण्यात आली. यात स्व. तात्यासाहेबांनी आपल्या हयातीत केलेल्या शेक्षणीक, सहकार, धार्मीक, अद्यात्मीक, क्षेत्रातील केलेल्या कार्याच्या स्मृतींना टॅ्रक्टरवरील देखाव्यांनी उजाळा देण्यात आला होता. सदर रॅली दरम्यान शहरातील विविध मार्गावर ठिक ठिकाणी चिखलीकरांच्या वतीने स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराजंली वाहण्यात आली. यावेळी अनुराधा परिवारातील सर्वच शैक्षणीक क्षेत्रासह विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थींनीं रॅलीत सहभागी झाले होते. तर तपोभूमी अनुराधा नगर येथील श्री मुंगसाजी महाराज मंदिर येथे पुणे येथील कथा प्रवक्ते हभप संजय गोडबोले यांचे श्री रामायण कथेवर प्रबोधन झाले. तर सायंकाळी ६:३० वाजता महाआरती घेण्यात आली. यात सुमारे ५०० जोडपे सहभागी झाले होते. त्यानंतर रात्री आवाजाचे जादुगार हभप श्री पुरूषोत्तम पाटील यांचे किर्तन संपन्न झाले. यावेळी बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक , काँग्रेस नेते श्यामभाऊ उमाळकर, माजी आमदार रेखाताई खेडेकर, शिवसेनेचे प्रा.नरेद्र खेडेकर, शिप्रमचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, रामदास निमावत, विनायक सरनाईक,यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणीक व धार्मीक, अद्यात्मीक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.