नीट २०२४ च्या परीक्षेत पुन्हा बुलढाण्याच्या पहेल इन्स्टिट्यूटचा गुलाल; २० पेक्षा अधिक विद्यार्थी ४०० पार ! श्रेया भुसारी ६४५, उमेश परिहार ५८०, पायल बाहेकर ५४३ यांनी कमावले विशेष गुणाधिक्य..
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील सर्क्युलर रोडवरील पहेल इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहली आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे पहेल इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी नीटमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करतात. यावर्षी देखील पहेल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले. २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ४०० पार गुण मिळविले. भारतातील सर्वोत्तम वैद्यकीय महाविद्यालय AIIMS मध्ये पहेल इन्स्टिट्यूटच्या सृष्टी सावळे ह्या विद्यार्थिनीची निवड झाली होती. दोन वर्षाच्या परिपूर्ण तयारीतून पहेल इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. कोटा ,लातूर, नांदेड, या ठिकाणच्या जीवघेण्या स्पर्धेत विद्यार्थ्यांचे हाल पाहता बुलढाणातूनच नीट परीक्षेची परीपक्व तयारी होते. हे निकालातून सिद्ध झाले आहे. असे मत पहेल इन्स्टिट्यूटच्या टीमने व्यक्त केले आहे.