BREAKING चिखलीत मोठ्या सिमेंट व्यापाऱ्याच्या दुकानावर GST विभागाची धाड! दुकानाला सील लावले; कोण आहे "तो" व्यापारी? बातमीत वाचा...

 
जदक
चिखली(गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातून एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील एका बड्या व्यापाऱ्यावर जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. चिखली शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वाधवाणी सिमेंट हाऊसवर जीएसटी विभागाने छापा मारला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यापारी अनियमितपणे जीएसटी कर भरत होता..तसेच प्रत्यक्ष असलेला व्यवसाय आणि कागदोपत्री व्यवसाय यात तफावत असल्याने जीएसटी विभागाने छापेमारी केली. तपासणी दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्याने संबधित दुकानाला सील लावण्यात आले आहे. आज २८ जूनला झालेल्या या कारवाईमुळे चिखली शहरासह परिसरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान या कारवाईचा विस्तृत तपशील अद्याप प्राप्त होऊ शकला नाही.