जिल्हाधिकारी कार्यालयात हिंदुसूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्त अभिवादन!

 
mnk
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाधिकारी कार्यालयात  हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त आज,२२ मे रोजी अभिवादन करण्यात आले.
 

अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, नायब तहसीलदार संजय बंगाळे, शिला पाल, सरला सपकाळ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.