"कोरोना सुपर स्प्रेडर'साठी बुलडाण्यात महा चाचणी शिबिर! , 12 जानेवारीला आयोजन; 29 केंद्र
विविध व्यावसायिक, व्यापारी प्रतिष्ठान, भाजीपाला ,फळ विक्रेते आदी घटक कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून ओळखले जातात. यामुळे व शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, प्रशासनाने या मेगा कॅम्पचे आयोजन केले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या या शिबिरात व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते आदींची कोरोना चाचणी करण्यात येईल. तहसीलदार रुपेश खंडारे व तालुका आरोग्य अधिकारी बढे यांच्या मार्गदर्शनात नगरपरिषद व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपरिषद, सुंदरखेड बसस्थानक, शबनम कॉम्प्लेक्स, बाजार समिती, दत्त मंदिर धाड नाका, महात्मा फुले शाळा, मातृभूमी व्यायाम शाळा, डीएसडी मॉल, एआरडी मॉल, संगम चौक, सहकार विद्या मंदिर, डॉ. पिंपरकर दवाखाना, न. पा. शाळा क्रमांक 2, इकबाल चौक, सराफा गल्ली, लद्धड हॉस्पिटल, संभाजीनगर, सामाजिक न्याय भवन, एसबीआय कोषागार कार्यालय, सैनिकी मंगल कार्यालय, प्रशासकीय इमारत, उर्दू शाळा कारंजा चौक या ठिकाणी या चाचण्या होणार आहेत. यासाठी डॉक्टर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.