GOOD NEWS २९ जानेवारीला बुलडाण्यात माहौल नारीशक्तीचा!महिलांसाठी " न्यू होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा" कार्यक्रम!

राजर्षी शाहू मल्टीस्टेट तथा धनिक ॲडव्हायझर्स चे आयोजन! गप्पा-गोष्टी, रंजक खेळ, गाणी आणि धम्माल मज्जा....
 
बुलडाणा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गतवर्षाप्रमाणे यंदाही धनिक ॲडव्हायझर्स तसेच राजर्षी शाहू मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने खास महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता बुलडाण्यातील शारदा ज्ञानपीठचे प्रांगणात महिलांसाठी हा आनंददायी कार्यक्रम होणार आहे. 
Home minister
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम खास महिलांसाठी आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेने क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत "न्यू होम मिनिस्टर" या कार्यक्रमात, पैठणीचा खेळ रंगत असतो. गप्पागोष्टी, रंजक खेळ, तसेच हिंदी, मराठी गाणी यातून महिलांच्या आनंदाला उधाण येते. मागील वर्षी सुद्धा जिजामाता प्रेक्षागर मैदानात पार पडलेला हा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. तमाम बुलडाणेकर महिलांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे राजर्षी शाहू मल्टीस्टेट परिवाराच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आरोग्यदायी भेट मिळणार आहे. महिलांना निशुल्कपणे या कार्यक्रमात सहभागी होता येणार असून पैठणीच्या खेळातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देखील मिळणार आहेत. त्यामध्ये फ्रिज ,वॉशिंग मशीन ,एलसीडी अश्या आकर्षित पारितोषिकांचा समावेश आहे. त्यासह पाच मानाच्या पैठण्या विजेत्या महिलांना मिळणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मालतीताई शेळके यांनी केले आहे.