GOOD NEWS मराठवाडा ईको बटालियनमध्ये होणार पदभरती! कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या..

 
Milistry
बुलडाणा(जिमाका):मराठवाडा ईको बटालियन, 136 इन्फंट्री बटालियनमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती फक्त सशस्त्र सेनेतील माजी सैनिक आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, तसेच राज्य शासनाच्या वन विभागातून सेवानिवृत्त महिला कर्मचाऱ्यांमधून होणार आहे. जेसीओ सोल्जर जीडी, भरती महाराष्ट्र राज्याकरिता होणार असून ट्रेडसमनसाठी ऑल इंडिया भरती होणार आहे. 
पदभरतीमध्ये जेसीओ 6 जागा आणि 220 जागा सोल्जरच्या भरण्यात येणार आहे. ही पदभरती फक्त महाराष्ट्र राज्याकरिता असून भरती ही 101, इन्फंट्री बटालियन, जनरल परेड ग्राउंड, अर्जुन मार्ग, पुणे येथे दि. 24 ते 27 जुलै 2023 पर्यंत होणार आहे. तसेच क्लार्क जीडी 6 पदे, चेफ कम्युनिटी 5 पदे, वाशरमॅन 2 पदे, ड्रेसर 3 पदे, हाऊस किपर 3 पदे, ब्लॅकस्मीथ 1 पद, मेस किपर 1 पद, आर्टीसन वुड वर्क 1 पद, मेस चेफ 1 पद, असे एकूण 249 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती मुख्यालय, 97, आर्टिलरी ब्रिगेड, संभाजीनगर, मिलीटरी कॅन्ट येथे दि. 31 जुलै ते दि. 4 ऑगस्ट 2023 पर्यंत होणार आहे. 
भरती झालेले कर्मचारी मराठवाडा संभागमध्ये वृक्षारोपण गतिविधी, तसेच संपुर्ण युनिट बंदोबस्तासाठी कार्य करतील. संपुर्ण भारतात विविध नेमलेल्या ऑपरेशनल ड्युटी करतील. पेन्शनधारक माजी सैनिक हा निवृत्तीनंतर भर्तीच्या वेळेस पाच वर्षाआतील असावा. माजी सैनिक शेप-1 असावा. कोणत्याही पोलिस किंवा सिवील केसमध्ये सामील नसावा. कॅरेक्टर एक्झेम्पलरी किंवा व्हेरी गुड असावा. भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे ही डिस्जार्च बुक, इएसएम ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, आधार कार्ड, फोटोग्राफ आवश्यक आहेत. भरतीबाबत अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक : 9168168136, 0240-230195 किंवा ईमेल- ecoterriersone36@gmail.com यावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.