GOOD NEWS पत्रकार व कुटुंबीयांची उद्या संपूर्ण आरोग्य तपासणी ! व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने बुलडाण्यात आयोजन

 
Vvnn
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशातील पत्रकारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने उद्या, गुरुवारी दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पत्रकार भवनावर सकाळी नऊ वाजता या शिबिराला सुरुवात होईल. तज्ञ डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून तपासणी करणार आहेत. या शिबिरासाठी उपाशीपोटी चहा, नाश्ता न करता उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी व निरोगी आयुष्य आरोग्य ठेवावे, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे. शिबिरानंतरही उपचाराची ज्यांना गरज असेल, त्यांना पुढील सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ, सरचिटणीस गजानन धांडे, शहराध्यक्ष गणेश निकम यांनी दिली असल्याचे प्रसिध्दी प्रमुख संदीप वंत्रोले यांनी कळवले आहे.
सर्व पत्रकारांनी लाभ घ्यावा - अनिल म्हस्के
व्हाईस ऑफ मीडिया ही पत्रकार व पत्रकारितेच्या प्रश्नावर काम करणारी संघटना आहे. बुलढाणा शहरातील सर्व पत्रकारांनी कुटुंबासहित आरोग्य तपासणीला उपाशी पोटी हजर रहावे, असे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले आहे.
सकाळी ११ वाजता सत्कार कार्यक्रम..
आरोग्य तपासणी झाल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी पत्रकार भवन येथे सकाळी ११ वाजता शहरातील ज्येष्ठ पत्रकार व यशश्री मिळवणाऱ्या पत्रकारांचे पाल्य, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार देखील व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात येणार आहे.