जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी! उद्योजकता विकास केंद्रातर्फे बुलडाण्यात शेळी, कुक्कुट, पशूपालन प्रशिक्षण! लाखो रुपयांचा व्यवसाय कसा उभारायचा ते शिकवणार! कधी, कसे ते वाचा....

 
Fhvc
बुलडाणा(जिमाका):  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण दि. ४ ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे.

सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करावा, यासाठी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात शेळी, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, निर्मिती व चाऱ्याचे प्रकार आणि उद्योग सुरु करण्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी, मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणात तज्‍ज्ञ व्यक्ती करणार आहेत. प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय १८ ते ५० वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. ४ सप्टेंबर २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, दूरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा, मोबाईल नंबर 8275093201 / 9011578854 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदिप इंगळे यांनी केले आहे.