शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! जिल्ह्यात पुढचे ५ दिवस पावसाचे..! कसे राहील हवामान? जाणून घ्या...

 
Hgf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात जवळपास सर्वच भागातील पेरणी आटोपल्यात जमा आहे. काही शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली होती, त्या शेतकऱ्यांची कोळपण्याची कामे सुरू झाली आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज,२ जुलै प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासा करणार आहेत. जवळपास जिल्ह्यातील बहुतांश भागात पुढच्या पाच दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे. 
 २ जुलै ते ४ जुलै दरम्यान व ६ जुलै रोजी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ५ जुलै रोजी काही ठिकाणी अगदी हलका पाऊस होऊ शकतो. २,३,४ आणि ६ जुलै सुरळक ठिकाणी मेघगर्जनीसह विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याशी शक्यता आहे अशी माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री मनीष येदुलवार यांनी दिली आहे.