कौतुकाची बातमी! माय - बापांच्या कष्टाचं पोरांनी चीज केलं अन् गावांन डोक्यावर घेतलं! अंचरवाडीचे तीन शेतकरीपुत्र झाले अग्निवीर..!! गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक

 
jdskfjds
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुर्दम्य इच्छाशक्ती, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नांवर विश्वास असला की अशक्य असं काहीच नसत..मग संकट कितीही आडवी आली तरी त्या संकटांवर मात करता येतेच.. अंचरवाडीच्या तीन शेतकरी पुत्रांनी तेच दाखवून दिलंय..शेतीत अपार कष्ट करणाऱ्या मायबापांच्या कष्टाचं चीज कसं करायचं असत हे "त्या" तिघांनी दाखवलं..भारतीय सैन्यात झालेल्या "अग्निवीर" योध्यांच्या भरतीत त्यांनी बाजी मारली. गणेश तुकाराम इंगळे, स्वराज विष्णू कुऱ्हे आणि ज्ञानेश्वर दिपक गुप्ता अशी या तिघा जिगरबाज तरुणांची नावं आहेत..त्यांचा आतापर्यंतचा संघर्ष डोळ्यांनी पाहलेल्या गावकऱ्यांना देखील याचा चांगलाच आनंद झाला आणि गावकऱ्यांनी जंगी मिरवणूक काढत त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतल..
 

add

  गणेश, स्वराज आणि ज्ञानेश्वर या तिघांचेही आईवडील शेती व शेतमजुरी करतात. मोठ्या कष्टातून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं..मुलांनीही सैन्य भरतीसाठी खडतर मेहनत केली..आता या मेहनतीच फळ त्यांना मिळालं. तिघांचीही अग्नीवीर मध्ये निवड झाल्याने देशसेवा करण्याचं त्यांचं स्वप्न साकार होणार आहे. 

त्यांच्या या यशाची बातमी कळताच तिघांच्याही आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. गावकऱ्यांनी गणेश इंगळे आणि स्वराज कुऱ्हे यांची गावातून मिरवणूक काढली. ज्ञानेश्वर यावेळी परीक्षेसाठी बाहेरगावी असल्याने त्याचे वडील दिपक गुप्ता या मिरवणुकीत सहभागी होते. लेकरांच्या कौतुकाचा सोहळा पाहून आईवडील भारावले होते. गणेश,स्वराज आणि ज्ञानेश्वरची ही निवड इतर तरुणांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे.