दिलासादायक बातमी! आज बुलडाणा जिल्ह्यात पाऊस बरसणार;जिल्हा कृषी हवामान केंद्राने नेंमक काय ते सांगितलं..पुढील ५ दिवस पाणीच पाणी! पण तरीही...नका करू पेरणीची घाई...!

पुढील ५ दिवसांचा अंदाज कसा असेल वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातले सारेच शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. जून चा शेवटचा आठवडा उजाडण्याच्या उंबरठयावर असला तरी पाऊस बरसला नाही. गुजरात मध्ये धडकलेक्या बिपरजॉय चक्रीवाळामुळे यंदा साराच गेम फिस्कटला असून पावसाकडे सगळे शेतकरी डोळे लावून आहेत. अशातच आज,२३ जूनच्या मुहूर्तावर भारतीय हवामान विभागाच्या सौजन्याने जिल्हा कृषी हवामान केंद्राने ५ दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. विशेष म्हणजेच आजच  जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची सरी बरसणार असल्याचे त्यात म्हटले आहे. आता ती नशीबवान तुरळक ठिकाणे कोणती हे मात्र त्या अंदाजात सांगितले नाही.

 २४ आणि २५ जूनला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. २६ आणि २७ जूनला जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे जिल्हा कृषी हवामान विभागाने म्हटले आहे. याशिवाय पुढील ५ दिवसांत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होईल असेही अंदाजात म्हटले आहे.

दरम्यान पुढील ५ दिवस पावसाचे असे अंदाजात म्हटले असले तरी तो सार्वत्रिक स्वरूपाचा असेल असे अंदाजात म्हटले नाही. त्यामुळे काही भाग पावसापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पेरणीची घाई न करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. ७५ ते १०० मिमी पाऊस सलग दोन ते तीन दिवस झाल्यावर व ओल १ फुटापर्यंत गेल्यावरच पेरणीचा निर्णय घ्यावा असे जिल्हा कृषी हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ मनीष येदुलवार यांनी म्हटले आहे.