चोरट्यांना देव सोडणार नाही! अंचरवाडी फाट्यावरील गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडली

 
fjfdkk
अंचरवाडी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरटे कधी काय चोरतील याचा नेम नाही, भुरटे चोरटे तर त्यांचा खाण्या पिण्याचा शौक भागवण्यासाठी देवाच्या मंदिरातील दानपेटीवर देखील डल्ला मरतात.चोरट्यांना वाटत की देव त्यांना पाहत नसेल, तो काय करेल? एक मात्र नक्की चोरट्यांना देव सोडत नाही, कधी ना कधी त्यांना त्यांच्या पापाचे फळ मिळतेच..आता अंचरवाडी फाट्यावर असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या भामट्यांना देव कधीतरी शिक्षा देईलच..चिखली तालुक्यातील अंचरवाडी फाट्यावर असलेल्या मंदिरातील दानपेटी फोडण्यात आल्याचा प्रकार आज, १ ऑगस्टच्या सकाळी समोर आलाय..त्यामुळे भक्तमंडळी आता 'चोरट्यांना देव सोडणार नाही" अशा भावना व्यक्त करीत आहेत.
 

चिखली देऊळगावराजा रोडवरील अंचरवाडी फाट्याची जिल्हा वाहतूक पोलिसांकडे ब्लॅक स्पॉट म्हणून नोंद होती. अंचरवाडी फाट्यावर आतापर्यंत झालेल्या अनेक अपघातात बरेच जण मृत्यू पावलेत तर अनेक जण जायबंदी झाले आहेत. भितीदायक वाटणाऱ्या या ठिकाणी अंचरवाडी ग्रामस्थांनी छोटेसे गजानन महाराजांचे मंदिर उभारले,त्यानंतर आता याठिकाणी अपघात झालेच नसल्याचा दावा गावकऱ्यांकडून करण्यात येतो. दरम्यान आज ,१ ऑगस्टच्या सकाळी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे समोर आले. दानपेटीत नेमकी किती रक्कम होती याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. वृत्त लिहीस्तोवर पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.