दे धक्का ! कालबाह्य एसटी बसेस बंद पडल्याने प्रवासी त्रस्त! जयस्तंभ चौकात बस पडली बंद..!!

 
Uhg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बस गाड्या कालबाह्य झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना अनेक वेळा नाहक त्रास सहन करावा लागतो. मेहकर-खामगाव मार्गावर नुकतीच एसटी बस स्टेरिंग तुटल्याने झाडाला धडकली. २५ प्रवासी जखमी झाले.आज ५ फेब्रुवारीला इंजिन तापल्याने शहरातील जयस्तंभ चौकात एसटी बस बंद पडली होती. या भंगार बसला अखेर पोलिसांनी व प्रवाशांनी धक्का मारला तरी ती सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.

Ghube

      ( जाहिरात👆)

बुलडाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार अनेक वेळा समोर आला. बस आगारातील बहुतेक एसटी बसेस कालबाह्य झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील रस्त्यांची ही दयनीय अवस्था आहे. नवीन बस गाड्या अशा रस्त्यांवर सोडल्या तर त्या खराब होतील, म्हणून भंगार बसेस पाठविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. एसटी बसेस कुठल्याही रस्त्यावर आणि कुठेही बंद पडतात.

दुरुस्ती करणारी चमू येईपर्यंत बस रस्त्यावर उभी राहते. परिणामी प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते किंवा अनेकदा बस दुरुस्त होत नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा पर्याय निवडून गाव गाठावे लागते. आज अकोला कडून बुलडाणाकडे येत असलेली बस शहरातील जयस्तंभ चौकात बंद पडली. त्यामुळे पोलीस आणि एसटी चालक, वाहकांना व प्रवाशांना दे धक्का..म्हणत धक्का मारावा लागला शिवाय नाहक त्रास सोसावा लागला आहे.