जिल्ह्याच्या निकालात मुलीच अव्वल! दहावीचा जिल्ह्याचा निकाल ९३.९० टक्के; अमरावती विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानावर..

 
fghjk
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज,२ जून रोजी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे.  जिल्ह्याच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींची पास होण्याची टक्केवारी अधिक आहे. मुलींची टक्केवारी ९५.६१ तर मुलांची टक्केवारी ९२.६९ टक्के एवढी आहे.
 

राज्यात अमरावती विभागाचा निकाल ९३.२२ टक्के  एवढा लागला. अमरावती विभागात वाशिम  जिल्हा अव्वल स्थानी असून बुलडाणा जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल गेल्यावर्षी यंदा पेक्षा सरस लागला होता, मागील वर्षीचा निकाल ९७.१६ टक्के होता यंदा निकालात ३.२६ टक्क्यांची घट आहे.