भूत बसलं मानगुटीवर! जिल्ह्यात आज तब्‍बल ४२ कोरोनाबाधितांची भर!!

 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हलगर्जीपणा कसा जीवावर बेतू शकतो, याचे उदाहरण पुन्हा एकदा बुलडाणेकरांसमोर आले आहे. कोरोनाविषयक कोणतेही नियम न पाळणाऱ्या बहाद्दरांमुळे कोरोनाचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसले असून, आज, ८ जानेवारीला जिल्ह्यात तब्‍बल ४२ बाधितांची भर पडली आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या १०७ झाली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण १०५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी १०१० अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील ३३ व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील ९ अहवालांचा समावेश आहे.

निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील २५२ तर रॅपिड टेस्टमधील ७५८ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेले अहवाल असे : बुलडाणा २१, खामगाव ७, शेगाव ४, देऊळगाव राजा २, चिखली १, मेहकर १, मलकापूर ३, नांदुरा १, लोणार २. जिल्ह्यात आजपर्यंत ६७६ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. ८६९९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.