गझल, शेरोशायरी अन् बरच काही, बुलढाण्यात दर्जेदार मैफिल ए मुशायरा ! देशातील नामवंत शायरांकडून एक संध्याकाळ संदीप शेळकेंना समर्पित..

शेळके म्हणाले, उर्दू साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अपक्ष उमेदवार तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांच्या समर्थनार्थ ऑल इंडिया मुशायराच्या वतीने ' एक शाम संदीप शेळके साहब के नाम'  या मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी स्थानिय जिजामाता प्रेक्षागार समोरील प्रांगणात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात उर्दू चाहते, रसिक व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. दरम्यान,  उर्दू साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याचा शब्द संदीप शेळकेंनी उपस्थितांना दिला.

एका पेक्षा एक दर्जेदार सादरीकरणाने यामुळे  कार्यक्रमात रंगत वाढत गेली. उर्दू भाषेतील शेरोशायरी, गझल , काव्यगीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. विशेष म्हणजे देशभरातील नामवंत उर्दू शायर या मुशायरात सहभागी झाले होते.  यावेळी संदीप शेळके म्हणाले की, उर्दू ही  अतिशय गोड भाषा आहे. कमी शब्दांत अर्थपूर्ण

आशय व्यक्त करणारी ही भाषा आहे. आज शेकडो वर्ष झाली असली तरी गालिब,  मिरतकीमिर ते  अलीकडच्या काळातील शायरांची  शायरी अजूनही लोकप्रिय आहे.  त्यामुळे भविष्यात देखील उर्दू साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे शेळके म्हणाले.

 Vjhg

       Advt