बापा बाप्पा हत्ता शिवारात पकडलेला गांजा १,४०,२७७०० रुपयांचा! तुरीच्या वावरात सापडले मोठे घबाड

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार शिवारातील हत्ता शिवारातील तुरीच्या शेतात काल,१२ डिसेंबरच्या सायंकाळी एलसीबीने छापा टाकला होता. तुरीच्या शेतात गांजांची झाडे लावल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आज, पहाटे पर्यंत ही कारवाई चालली. दरम्यान या कारवाई कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे समोर आले आहे.
हत्ता शिवारातील गट न १८१ मधील अनिल धुमा चव्हाण याच्या शेतात एलसीबीने छापा मारला होता. या शेतात गांजांची लागवड करण्यात आल्याची माहिती खबऱ्यांनी "एलसीबी" ला दिली होती. काल सायंकाळी सुरू करण्यात आलेली ही कारवाई पहाटे पर्यंत चालली. तुरीच्या शेतातून तब्बल १५ क्विंटल गांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी ४० लाख २७ हजार ७०० रुपये असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणाचा सविस्तर तपशील सायंकाळी समोर येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलडाणा स्थित कार्यालयात या प्रकरणाची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, सायंकाळी सव्वा पाच वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.