गणेश मंडळांनी दहा दिवस मतदार नोंदणीचे स्टॉल लावून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे! मनसे नेते शैलेश गोंधणे यांचे आवाहन..

 
ytj

चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण राज्यभर गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. १९ ते २८ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण देशात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या दहा दिवसांत गणेश मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यात सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा कार्यक्रमांचा समावेश असतो. या उपक्रमांसोबतच गणेश मंडळांनी दहा दिवस नवीन मतदार नोंदणीचे स्टॉल लाऊन राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

add
गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आणि चिखली शहरात विविध गणेश मंडळाच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. येणाऱ्या वर्षभरात देशात लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका होणार असून अनेकांना निवडणुकीत आपल्या उमेदवाराला, आपल्या पक्षाला मतदान करण्याची इच्छा असते अनेक तरुण अतिउत्साहाने पहिल्यांदा मतदान करीत असतात परंतू यासाठी मतदार यादीत नाव असणे महत्त्वाचे असते. येणाऱ्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार नोंदणी करणे गरजेचे असून प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ ही तारीख १८ वर्ष वयाच्या नवीन मतदारांना नोंदणी साठी अंतिम आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यास हातभार म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या मंडळा समोर दहा दिवस नवीन मतदार नोंदणीचा स्टॉल लावुन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, अशी विनंती व आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गणेश मंडळांना केले आहे.