'बुलडाणा अर्बन दिव्य विवेकानंद' मध्ये गणरायाची स्थापना; बाल विद्यार्थ्यांची मिरवणूक ठरली लक्षवेधी

 
hff
बुलढाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिय बुलडाणा अर्बन दिव्य विवेकानंद क्लासेस येथे गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी परिसरातून गणरायाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अभ्यासाचा ताण तणाव विसरून विद्यार्थीनी विद्यार्थी भक्ती गीतांच्या तालावर थिरकले. यावेळी बालगोपालांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जल्लोषात निघालेली ही छोटेखानी मिरवणूक ' विवेकानंद' मध्ये दाखल झाल्यावर पालकांच्या हस्ते गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.  
 

add

प्रा. संदीप पाटील, प्रा राहुल पाटील, अश्विनी शिरसाट-पाटील व कर्मचाऱ्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. दरम्यान विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा, उत्सवाची ओळख व्हावी, त्यांच्यातील अंगभूत कला कौशल्याला संधी मिळावे,  यासाठी बुद्धीच्या देवतेची स्थापना करण्यात आल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.