गाडेगाव बु. पुलाचे काम 5 वर्षांपासून पूर्ण न झाल्याने गावाचा संपर्क तुटला..गावकरी संतप्त...!

रविकांत तुपकरांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला झाप-झाप झापले..

 
Vhgf
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे काल पासूनच जळगाव जामोद-संग्रामपूर तालुक्यात तळ ठोकून आहेत. आज सकाळ पासूनच तुपकरांनी जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बु., गाडेगाव खुर्द, नवे गोळेगाव, टाकळी खासा, टाकळी पारस्कार, कुरनगाड, भेंडवळ, चावरा, इलोरा, मडाखेड, येनगाव, वडशिंगी, जळगाव यासह अन्य गावांचा दौरा केला. नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला. 

गाडेगाव बु. येथे तुपकर गेले असता नदी पार करून जावे लागले, त्यानंतर गावकऱ्यांशी तुपकरांनी संवाद साधून गावकऱ्यांच्या संतप्त भावना ऐकून घेतल्या, गेल्या 5 वर्षांपासून गावच्या पुलाचे काम चालू असून ठेकेदार काम पूर्ण करण्यास तयार नाही, त्यामुळे गावकऱ्यांना व  नदीतून ये-जा करावे लागते, हे ऐकून तुपकर संतप्त झाले, त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदाराला फोन लावत झाप-झाप झापले, आजच्या आज काम चालू करा, अन्यथा परीणाम भोगावे लागतील, असा अल्टिमेटमच तुपकरांनी दिला. त्यानंतर मात्र ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. यावेळी गावकऱ्यांना व ठेकेदाराला तुपकरांचा रुद्र अवतार बघायला मिळाला.