माजी मंत्री स्व. डॉ. राजेंद्रजी गोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या अभिवादन सभा! वाचा त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल..

 
gode
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी मंत्री तथा इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. डॉ. राजेंद्रजी गोडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या,२१ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 

gode

 स्व. राजेंद्रजी गोडे यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन व प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जुना अजिसपुर रोड परिसरातील स्व. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय येथील स्मृतीस्थळावर हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील स्व. राजेंद्रजी गोडेंना अभिवादन करणार आहेत. याशिवाय इतरही कार्यक्रमांचे आयोजन इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत.

स्व. डॉ. राजेंद्र गोडेंचा असा होता राजकीय प्रवास : 

१९९० ते १९९५ दरम्यान ते बुलडाण्याचे आमदार होते. १९९२ ते १९९२ दरम्यान त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. त्यासोबतच उद्योग, कामगार ही खातीही त्यांच्याकडे होती. मूळचे वर्धा जिल्ह्यातील खरांगना (गोडे) येथील रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र गोडे शल्यचिकित्सक म्हणून लौकिक प्राप्त होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी २५ हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या होत्या. प्रशासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी नागपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधीक्षक तथा वैद्यकीय अधिकारी म्हणून १६ वर्षे काम पाहिले होते. १९८९-९० दरम्यान त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ९ वर्षांपूर्वी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.