थकीत वेतनासाठी वनमजुरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण!

 
Nfjf
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : थकीत वेतन मिळण्यासाठी देऊळगाव राजा तालुक्यातील वनमजूर, वनसंरक्षक काल १२ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
यासंदर्भात आधीच उपोषणकर्ते वनमजुरांनी वन अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले आहे की, सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातील जवलखेड, आसोला, पिंपळगाव, निमगाव गुरू, कॅनॉल या ठिकाणी वृक्ष लागवडीचे कामे झाली आहेत. मात्र कामाचा मोबदला म्हणून माहे जुलै - ऑगस्ट याकाळातील वेतन अद्याप मिळाले नाही. याविषयी वनपाल गवई यांना विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तरे देतात इतकचं नाही तर, वृध्द व्यक्तींना ते कामावर नियुक्त करतात. त्यामुळे थकीत वेतन तात्काळ मिळावे तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर वन संरक्षक बबन चव्हाण, मधुकर बांगाळे यांची स्वाक्षरी आहे.