मेहकरात अग्नितांडव! मटण मार्केट मध्ये आग २० ते २५ दुकाने जुळून खाक ​​​​​​​

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरच्या मटण मार्केट मध्ये आज,२६ जुलैच्या सायंकाळी मोठी आग लागली. या आगीत जवळपास २० ते २५ दुकाने जळून खाक झाली आहेत.
 

 मेहकर नगर पालिकेने बांधलेले हे मटण मार्केट होते. लाखो रुपये खर्चून गाळे बांधण्यात आले मात्र त्याऐवजी उघड्यावर मटण मार्केट सुरू होते. जळालेल्या दुकानांत भंगार साहित्य, प्लास्टिक साहित्य होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. अतिरिक्त तहसीलदार भूषण पाटील, मंडळ अधिकारी पंजाब मेटांगळे, नगरपरिषदेचे उपमुखाधिकारी रवींद्र वाघमोडे , विद्युत कर्मचारी संतोष राणे, तलाठी शिवप्रसाद म्हस्के घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आग कशाने लागली आणि आगीमुळे नेमके नुकसान किती झाले हे अद्याप कळाले नाही.