जेसीबी मशीनवर ड्रायव्हर म्हणून आला नाही म्हणून कायमचा संपवला ! चौघांनी मिळून युवकाला धाडले यमसदनी; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
Ggb
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील धानोरा सटवाई गावात खळबळजनक घटना घडली आहे. जेसीबी मशीनवर ड्रायव्हर म्हणून काम करायला नकार दिला म्हणून जेसीबी मालक व त्याच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीवनातून कायमचे संपवले. याप्रकरणी किनगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन दगदुबा घोरपडे (३२) असे मृतक तरुणाचे नाव आहे.
 गजानन घोरपडे याला परमेश्वर विष्णू वायाळ याने आमच्या जेसीबी वर ड्रायव्हर म्हणून का येत नाही अशी विचारणा केली. मनात कपट ठेवून परमेश्वरने गजाननच्या डोक्यात लाकडाचा जोरात वार केला.
परमेश्वरचे वडील सीताराम वायाळ,गीता वायाळ आणि परमेश्वरची बायको स्वाती वायाळ यांनीदेखील गजानन ला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गजानन जागेवरच बेशुद्ध पडला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगरातील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.
  याप्रकरणात आरोपींच्या विरोधात आधीच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. आता आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.