कर्जबाजारीपणाला कंटाळून खामगाव तालुक्यातील ७६ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःला संपविले!

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव तालुक्यातील कदमापूर गावातील एका ७६ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 
  नारायण मुकाजी गुरव असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी काल पहाटे घरासमोरील टीन पत्रात दोरीच्या साह्याने गळफास घेतला. काही वेळाने घटना उघडकीस आल्यानंतर, तात्काळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. नारायण गुरव यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. गुरव यांच्या शेतीवर असलेल्या कर्जाचे हप्ते थकले होते. नवीन पीक कर्ज मिळणार नाही, या चिंतेतून गळफास घेऊन स्वतःला त्यांनी संपवले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.