सासरच्या छळाला वैतागली! विवाहितेने भरोसासेल समोर मांडली अडचण ; सासरच्या तिघांविरुद्ध बुलढाण्यात गुन्हा..
तक्रारदार पिडीता हल्ली बुलडाणा येथील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला लोणार येथील बोरकर कुटुंबात दिल्या गेले. दरम्यान, ७ मे २०१८ पासून ते २ एप्रिल २०२४ पर्यंत ती सासरी नांदत होती. परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे पिडीता माहेरी बुलढाणा येथे परतली. २०१८ - २४ दरम्यान पतीने, सासुने व नणंदेने तिला माहेरहून ५ लाख आणण्याचे सांगितले. एवढेच नाही तर, विविध कारणांमुळे तिचा छळ झाला असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे. बुलढाणा येथील भरोसा सेल विभागात पिडीत विवाहितेने २७ जून २०२४ रोजी तक्रार दिली.
परंतु पिडीत विवाहिता तसेच तिच्या सासरची समोपचार झाला नसल्याने भरोसा सेलने शहर पोलिसांना पत्र दिले. मिळालेल्या पत्रावरून बुलढाणा शहर पोलिसांनी पिडीत मुलीच्या पतीसह, सासू आणि ननंदे विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बळीराम खंडागळे करीत आहेत.