शेतरस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी महिलांसह शेतकऱ्यांचे तलावाच्या सांडव्यातच उपोषण!त हसिलदारांनी घेतली बैठक, सबंधीत विभागाला मागण्यानुसार तोडगा काढण्याचे आदेश!आंदोलक आंदोलनावर ठाम...
एकाची तब्येत खालावली.. स्वातंत्र्य दिनी आंदोलन सुरुच...
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील सोनेवाडी येथे १९९३-९४मध्ये झालेल्या पाझर तलावामुळे शेतकऱ्यांचा पुर्वीपार चालत आलेला रस्ता सांडव्यामध्ये गेला. सांडव्या शेजारी असलेली जमीन व सांडव्यातच एका महिलेने अतिक्रमण केले असल्याने शेतकऱ्यांना शेती साठी रस्ता उपलब्ध नसल्याने सांडव्या शेजारूण असलेल्या शासकीय जमीनिच्या सिमा निश्चीत करुण शेतरस्ता कायमस्वरुपी खुली करुण देण्यात यावा,यासह विविध मागण्यांसाठी सोनेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे यांच्यासह शेतकरी यांनी शेतातच सांडव्यात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.या आंदोलनाची दखल तहसिलदार काकडे यांनी घेत त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी बोलवुन घेत काल ,१४ ऑगस्ट रोजी चिखली तहसिल कार्यालयात बैठक घेतली. तर या प्रकरणी तातडीने तोडगा काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे यांनी म्हटले आहे. एका उपोषणकर्ते यांची तब्येत खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यात हलविण्याचा सल्ला दिला आहे.
Advt 👆
या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य सुधाकर तायडे,सुधाकर शेळके,अशोक काळे,बबन काळे, विजय पवार, सतीश काळे, प्रकाश तायडे ,भास्कर काळे, महादू गुंजकर, शिवाजी जंजाळ, रुस्तम शिरसाट,राजेंद्र पवार, विजय हाडे, शंकर मेहुणकर, समाधान जंजाळ, कस्तुराबाई जंजाळ, जनाबाई काळे, साखरबाई तायडे, सिंधुबाई जंजाळ ,कुशीव्रताबाई शेळके, मंगलाबाई काळे, अलकाबाई शिरसाट, सविताबाई काळे, सुरेखाबाई तायडे