शेतकऱ्यांनो सावध व्हा! जिल्ह्यात पुन्हा अवकाळी आणि गारपीटीची शक्यता! १६ मार्च धोक्याचा दिवस! वाचा काय होणार...

 
Vhhu
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज,१४ मार्च रोजी तसा अंदाज वर्तविला आहे.
    

भारतीय हवामान खात्याने आज, दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात १४ ते १८ मार्च  दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघगर्जनेसह विजांचा गडगडात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १६ मार्च रोजी ३० ते ४० किमी प्रती तास वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची देखील शक्यता आहे.

अवकाळी पावसाची वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी गहू व हरभरा पिकांची कापणी केलेली असल्यास शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. साठवणुकीची व्यवस्था नसल्यास शेतमाल प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा. फळबागांची योग्य ती काळजी घ्यावी. परिपक्व फळे काढून बाजारात विक्रीसाठी पाठवावी. विजांचा गडगडाट होणार असल्याने जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था गोठ्यातच करून ठेवावी असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे मनीष यदुलवार यांनी केले आहे.