पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी! शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी..! जून अर्धा संपला तरी जिल्हयात समाधानकारक पाऊस नाही;पेरणीची घाई करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट..

 
Bhvv

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जून महिना अर्धा संपून गेला असला तरी जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. कृषी विभागाने वारंवार आवाहन करून देखील काही , आता हीच घाई शेतकऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १० टक्क्यांपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. मात्र आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २४ तारखेपर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. "त्यामुळे पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी! शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी..!" अशा भावना शेतकऱ्यांच्या मनात दाटून आल्या आहेत.

 महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला सध्या ब्रेक लागलेला नाही. मराठवाडा आणि विदर्भात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. उलट केवळ ढगाळ हवामान असल्याने उकाडा वाढला आहे. काही शेतकऱ्यांनी १० जुनआधीच पेरणी केली, त्यानंतर फारसा पाऊस झाला नसल्याने पेरलेले बियाणे करपण्याच्या वाटेवर आहे. पुढच्या दोन दिवसांत पाऊस झाला नाही तर काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते.