ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुका कार्यकारिणीचा विस्तार!

 
crowd

सिंदखेड राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाच्या सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुका कार्यकारिणीचा ३० मार्च रोजी विस्तार करण्यात आला. मातोश्री लॉन्स येथे हा कार्यक्रम झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीईओ रंगनाथ गावडे होते. राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, जिल्हा सचिव अनिल हिस्सल, जिल्हा उपाध्यक्ष संजय ठाकरे, जिल्हा सहसचिव गजानन राऊत, चिखली तालुकाध्यक्ष राजाभाऊ वायाळ, सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष नंदकिशोर खरात, संपर्क प्रमुख विलास आघाव,रघुवीर लहाने उपस्थित होते.

यावेळी जिल्हा स्तरावर सहसचिवपदी प्रकाश आढाव, संघटक विकी जगताप व आकाश मेहेत्रे यांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. तर सिंदखेडराजा तालुका कार्याध्यक्ष विनोद सातपुते, उपाध्यक्ष पंजाबराव ताठे, संतोष वाघ, सचिव दत्तात्रय खरात, संघटक खंडू चौधरी, सहसचिव नीलेश ठाकरे, सहसंघटक सरला गावडे, प्रसिद्धी प्रमुख शरद नागरे, जेष्ठ सल्लागार रंगनाथ गावडे व गजानन वायाळ यांची नियुक्ती करण्यात आली.

देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदी संदीप शिंदे, कार्याध्यक्ष बाळकृष्ण तिडके, उपाध्यक्ष उद्धव चेके, सहसचिव संतोष बिथरे, महिला प्रतिनिधी अनुराधा रविंद्र सोळंके, मंदा राजेश दंदाले यांची नियुक्ती करण्यात आली.

सर्व पदाधिकारी महसूल, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, शिक्षण, पंचायत समिती, कृषी विभागात कार्यरत आहेत. यावेळी नारायण भागीले, भागवत निकम, नीलेश जाधव, आकाश आटोळे, विशाल रिंढे, रविंद्र सोळंके, अनिल आघाव, वशिष्ठ शिंदे, गोविंद माने, राजू मेहेत्रे, राजू आढाव, सुभाष सातपुते, बाळ पऱ्हाड, एकनाथ मेहेत्रे, राजेशकुमार दंदाले, अनिल बुरकुल, शंकर बुरकुल, अमोल चौथे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद ठाकरे यांनी केले. तर आभार संजय ठाकरे यांनी मानले.