ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू! लाखनवाडा - जयरामगड रस्त्यावर आज संध्याकाळी झाला अपघात

 
mhjhjkm
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील लाखनवाडा जयरामगड रस्त्यावर आज,२५ मेच्या सायंकाळी भीषण अपघात झाला. ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार संतोष गवई (२६, रा. कंचनपूर,ता.खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. संतोष  नांगरणी करण्यासाठी कंचनपूरवरून लाखनवाडा येथे गेला होता.तिथून परत येत असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या अपघातात संतोषचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील कारवाई सुरू आहे. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.