मजरध्वज खंडाळा, मेरा खुर्द व भरोसा गावात हिंदुराष्ट्र सेनेची शाखा स्थापन! धनंजय देसाई जिल्ह्यात येणार होते पण...झालं असं की..

 
crowd
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  धनंजय देसाई संस्थापक अध्यक्ष असलेल्या हिंदुराष्ट्र सेनेच्या विविध गावांत शाखा स्थापन होत आहेत. चिखली तालुक्यातील मकरध्वज खंडाळा, मेरा खुर्द व भरोसा या गावांत नुकत्याच हिंदुराष्ट्र सेनेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. मकरध्वज खंडाळा येथील कार्यक्रमाला धनंजय देसाई उपस्थित राहणार होते मात्र पोलिसांनी त्यांच्या जिल्हा बंदीचे आदेश काढल्याने ते येऊ शकले नाहीत. अखेर धनंजय देसाई  यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून मकरध्वज खंडाळा येथील जनसमुदायाला संबोधित केले अशी माहिती हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अनिल मंजुळकर यांनी कळवले आहे.
 

हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख विजय पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध गावांत शाखा स्थापनेचे काम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला धनंजय देसाई मकरध्वज खंडाळा येथे येणार होते मात्र तेव्हाही पोलिसांनी सभा रद्द केली आणि यावर्षीही पोलिसांनी सभा रद्द केली त्यामुळे पोलिस प्रशासनाचा हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने निषेध करण्यात येत असल्याचेही मंजुळकर यांनी कळवले आहे. शाखा स्थापनांच्या कार्यक्रमाला राजेश पिंगळे, जितेंद्र रनाळकर, राकेश चोपडा, दीपक गुळवे, गोपाल शिराळे, राहुल जवंजाळ, गजानन महाराज सपकाळ, गजानन महाराज ठेंग, रामकृष्ण ठेंग, अभिषेक चौबे, दिलीप काकडे, गौरव अग्रवाल, किरण महाराज शिंदे उपस्थित होते.