कासार मॅरेथॉन स्पर्धा बुलडाण्यात उत्‍साहात

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजातर्फे कासार मॅरेथॉन स्पर्धा २ जानेवारीला सकाळी बुलडाणा शहरात उत्‍साहार पार पडली.
अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  धाड नाका ते देऊळघाट मार्गावर ही स्‍पर्धा झाली. यावेळी शिवसेना वैद्यकीय आघाडी तालुकाप्रमुख डॉ. अरुण पोफळे, राजेश स्पोर्ट्‌स अँड वियरचे संचालक अरुण पिटकर, जीत स्पोर्ट्‌सचे संचालक जितेंद्र अक्कर, राजेश आडेकर, योगेश आडेकर, विनोद पोफळे, विशाल पोफळे, विनोद पोफळे, संजय पडोळसे, गोपाल चांदुरकर, आशिष पोफळे, योगेश पोफळे, इश्वर पोफळे, अंकित पोफळे, दिनेश रासने, गणेश रासने, महेश रासने, आशिष वडगावकर, अनिल तांबट, शुभम अक्कर, राहुल मुळे, गिरीश वैद्य, नंदू वैद्य, तेजस्विनी अरुण पिटकर, सौ. कल्याणी रवींद्र तांबट, सौ. वंदना अरूण पोफळे, सौ. पूजा जितेंद्र अक्कर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. स्पर्धेत बालगटातून श्रीवांश रवींद्र तांबट पहिला, श्रीजा जितेंद्र अक्‍कर दुसरी आणि स्वछंद अरुण पोफळे हा तिसरा आला आहे.