EDUCATIONAL STORY हो! सामान्यांची, शेतकऱ्यांची मुलही होऊ शकतात डॉक्टर! लातूर अन् कोट्याला जायची गरजच नाही; बुलडाण्यातील "करिअर पॉइंट कोटा" चा रिझल्ट पाहून तुम्ही म्हणाल" अशक्य असं काहीच नसतं!"

 
giykih
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   डॉक्टर बनण्याचे ध्येय ठरविणाऱ्या विद्यार्थांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी आधी "नीट" ही राष्ट्रीय स्थरावरील प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेची तयारी करायची असेल तर लातूर, छत्रपती संभाजीनगर अन् राजस्थानातील कोटा येथे गेल्याशिवाय पर्यायच नाही असा भ्रम गेल्या काही वर्षांत विद्यार्थी आणि पालकांमध्ये होता. तिथले शिक्षण प्रचंड खर्चिक असल्याने मध्यमवर्गीय आणि सामान्य शेतकऱ्यांची मुले डॉक्टर बनण्याचे स्वप्नही पाहू शकत नव्हते. मात्र आता बुलडाणा शहरातच "करिअर पॉईंट कोटा" या नावाने सुरू झालेल्या शैक्षणिक दालनामुळे मध्यमवर्गीय, सामान्य, शेतकऱ्यांची मुलेही डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचे ध्येय ठरवू लागलेत. अर्थात त्यासाठी कारणीभूत ठरला "करिअर पॉइंट कोटा" चा पहिल्याच बॅचचा रिझल्ट..! गेल्या कित्येक वर्षांपासून बुलडाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या यशाचे नवनवे किर्तीमान स्थापन करणाऱ्या प्रा.डॉ.एस.पी.भालके सर आणि प्रा. विजय पवार  सर यांच्या संकल्पनेतून कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळात बुलडाणा शहरात "करिअर पॉइंट कोटा" ची मुहूर्तमेढ रोवल्या गेली, आणि  २०२० च्या पहिल्याच बॅचचा  २०२२ ला हाती आलेला रिझल्ट "दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नसतं" हेच सिद्ध करणारा ठरला.

6uyy

 "करिअर पॉईंट कोटा" च्या बुलडाणा सेंटर चा विद्यार्थी कौस्तुभ राठोड याने  ७२० पैकी ५६२ गुण मिळवून त्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे एमबीबीएसला प्रवेश मिळवला तर साक्षी सुसर या जिजाऊंच्या लेकीने ७२० पैकी ५५२ गुण मिळवत अटल बिहारी वाजपेयी  वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे एमबीबीएस ला प्रवेश मिळवला. विशेष म्हणजे ५६२ गुण मिळवणारा कौस्तुभ राठोड हा बुलडाणा शहरात नीट ची तयारी करणाऱ्यांमधूनही अव्वल ठरलाय. याशिवाय बॅचच्या इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगले गुण मिळवले. बुलडाणा शहरात नीट ची तयारी करून ठरवलेले ध्येय गाठता येऊ शकते याची प्रचिती देणारा हा रिझल्ट ठरलाय. २०२३ मध्ये येणारा रिझल्ट हा आधीपेक्षा अधिक यशस्वी ठरेल असा विश्वासही करिअर पॉइंट च्या संचालकांनी व्यक्त केलाय.
  
तज्ञ प्राध्यापकांची टीम अन्  लाख रुपयांपेक्षा कमी शुल्क..!

बुलडाणा येथील "करिअर पॉइंट कोटा" येथे शिकवणारे सर्व प्राध्यापक हे त्या त्या विषयांचे नामवंत तज्ञ आहेत. सर्व प्राध्यापकांना दिल्ली, कोटा येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात शैक्षणिक संस्थामध्ये शिकविण्याचा अनुभव आहे. गरीब, होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी लाख रुपयांपेक्षाही कमी शुल्कात उच्च दर्जाचे,गुणवत्तापूर्ण शिक्षण "करिअर पॉइंट कोटा" च्या माध्यमातून मिळत आहे.

  २ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार नवीन बॅच..!
    
 करिअर पॉईंट कोटा ची नवीन बॅच २ एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहे. त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. 

प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क:
 9604092327, 7020782965
श्री. एस.पी भालके सर 9422182255
श्री. विजय पवार सर 9822937385